बिल गेट्स यांचा ‘मायक्रोसॉफ्ट’चा राजीनामा, 1975 मध्ये केली होती कंपनी स्थापन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सामाजकार्यात स्वत:ला झोकून द्यायचे असल्याचे कारण देत बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. त्यांना जागतिक आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम कराये आहे. त्यामुळेच ते सर्व जबाबदार्‍यांमधून मुक्त झाले आहेत. मात्र, ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.

आरोग्य आणि जागतिक विकासाला चालना देण्यासाठी द्यायचा आहे, यासाठीच ते कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा देत आहेत, अशी माहिती मायक्रोसॉफ्टकडून देण्यात आली. 1975 मध्ये पॉल अलेन यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. 2000 पर्यंत त्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडली होती.

बिल गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या 12 झाली आहे. यामध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांचाही समावेश आहे. बिल गेट्स यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे नडेला म्हणाले होते. त्यांचे ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीने कंपनी काम करत राहिल. संचालक मंडळाच्या सदस्यांना बिल गेट्स यांचं मार्गदर्शन मिळाले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्यांचाही भविष्यात कंपनीसाठी मोठा फायदा होईल आणि यापुढेही त्यांचा सल्ला कंपनीला मिळेल. मी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यातही हातभार लावू इच्छितो, असंही त्यांनी स्पष्ट केले.