राज्यातील किमान तापमानात घसरण ! पुण्यात हंगामातील सर्वात कमी 8.6 अंश तापमानाची नोंद

पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून जळगाव येथे सर्वात कमी किमान तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. नाशिक, पुणे, बारामती येथे या हंगामातील सर्वात कमी तापमानाची मंगळवारी सकाळी नोंद झाली आहे.

राज्यातील अनेक शहरामधील किमान तापमान सिंगल डिजिटपर्यंत खाली घसरले आहेत. राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान : जळगाव ७, पुणे ८.६, बारामती ८.८, सातारा १०.७, नाशिक ९.१, महाबळेश्वर १२.७, सांगली १३.९, जेऊर ९, मालेगाव १०.४, सांताक्रुझ १७.६, डहाणणु १७.१, ठाणे २०.२, औरंगाबाद १०.७, जालना १४, परभणी ९.९, उस्मानाबाद १२.४, नांदेड १०.७, अकोला १०.५, अमरावती १०.४, बुलढाणा ११.८, ब्रम्हपुरी १०.८, चंद्रपूर ११.४, गडचिरोली १०, गोंदिया ९.६, नागपूर १०.६, वर्धा ११, वाशिम १०.४, यवतमाळ १०़