राज्यमंत्री बच्चू कडूंचा दणका ! 2 तहसीलदार दर्जाच्या अधिकार्‍यांचं ‘तडकाफडकी’ निलंबन

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – कामात हलगर्जीपणा करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना सळो की पळो करून सोडणारे आमदार बच्चू कडू हे राज्यमंत्री झाल्यानंतर कसे काम करणार, याची उत्सुकता सर्वांनाच वाटत होती. परंतु, त्यांच्या कामाचा एक नुमना त्यांनी सुरूवातीलाच दाखवून दिला आहे. आपल्या पहिल्याच अमरावती दौर्‍यात बच्चू कडू यांनी दर्यापूर तहसील कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्यामुळे निरीक्षण अधिकारी सपना भोवते आणि नागरिकांना रेशन कार्ड न दिल्याने नायब तहसीलदार (पुरवठा) प्रमोद काळे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष असलेले बच्चू कडू हे सडेतोड बोलणारे आणि आक्रमक राजकीय नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यांनी पक्षाच्या दोन आमदारांचा पाठिंबा शिवसेनेला जाहीर केला होता. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. खातेवाटप झालेले नसल्याने सध्या त्यांच्याकडे कोणतेही खाते नाही. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याचा दौरा केला. दर्यापूर तहसील कार्यालयात आज दुपारी तीनच्या सुमारास राज्यमंत्री कडू यांनी अचानक भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांची धावपळ उडाली. यावेळी कडू यांनी तहसीलदारांना तात्काळ आढावा बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश दिले. या आढावा बैठकीमध्ये तहसील कार्यालयात रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीत संजय गांधी निराधार योजना आणि पुरवठा विभाग या दोन विषयावर एक तास चर्चा झाली. यावेळी काही लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि पुरवठा विभागात वारंवार चकरा मारूनही काम झाले नाही, अशी तक्रार राज्यमंत्र्यांकडे केल्याने संजय गांधी निराधार योजनेतील निरीक्षण अधिकारी सपना भोवते आणि पुरवठा विभागातील प्रमोद काळे यांना कामात हलगर्जीपणा केल्याने ताबडतोब निलंबित करण्याचे आदेश तहसीलदार योगेश देशमुख यांना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. तहसीलदार यांनी यासंदर्भात पुढील कारवाईसाठीचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठवला आहे.

बच्चू कडू यांच्या आक्रमकतेचे अनेक किस्से यापूर्वी राज्यात गाजले आहेत. मंत्रालयात कक्ष अधिकार्‍याच्या कानाखाली वाजवल्याचे प्रकरण, तुरीचा थकीत चुकारा न दिल्यामुळे अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍याला तीन तास कार्यालयात कोंडण्याचे प्रकरण, गाजले आहे. नाशिकमध्ये तर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर त्यांनी हात उचलला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?