गृह मंत्रालय : पहिल्यांदाच मोबाईल अ‍ॅपव्दारे होणार 2021 ची जनगणना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०२१ च्या जनगणनेसाठी देशात बरीच कामे केली जात आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील जनगणना मोबाइल अ‍ॅपद्वारे केली जाणार आहे. मंत्रालयाने सांगितले की, ‘२०२१ च्या जनगणना अशी पहिली जनगणना असेल ज्यात मिक्स मोड अप्रोचद्वारे एक मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घेतली जाणार होईल. हे अ‍ॅप भारतीय निबंधक जनरल ऑफिस ऑफ इंडियाने तयार केले आहे. लोकसंख्या मोजणीच्या टप्प्यात, जनतेला ऑनलाइन स्व-गणनेची सुविधा असेल.

मंत्रालय पुढे सांगितले कि, जेथे जनगणना कायदा १९४८ अंतर्गत आपल्या डेटाविषयी गोपनीयतेची हमी दिली गेली आहे. त्याचबरोबर या कायद्यानुसार सार्वजनिक आणि जनगणना अधिकाऱ्यांना कायद्याचे पालन न केल्यास किंवा कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केल्याबद्दल दंड होऊ शकतो.

फेसबुक पेज लाईक करा –