दुर्देवी ! केवळ मुलाला ‘कॉल’ करून बोलते म्हणून कुटुंबियांनी भरचौकात मुलीला दिली ‘ही’ शिक्षा

अलिराजपूर : वृत्तसंस्था – आपली मुलगी कोणत्यातरी मुलाशी फोनवर बोलत असल्याच्या संशयावरून तिच्या, कुटुंबीयांनी भर रस्त्यात तिला मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रस्त्यावरील लोकांसमोरच मुलीचे केस कापले आणि तिला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील अलिराजपूर मधील सोंडवा येथे घडली आहे.

अल्पवयीन मुलगी मुलाशी फोनवर बोलत आहे असा संशय तिच्या कुटुंबियांना आला. कुटुंबीयांनी रागाच्या भरात भर चौकात गावकऱ्यांसमोर तिचे केस कापले आणि मारहाण सुद्धा केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज बब्बर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींवर एफआयआर दाखल केलेले आहे. मी गेल्या वर्षी गुजरातमध्ये गेले होते तेव्हा, माझी अलिराजपूर मधील सुमनियावाट गावातील एका मुलाशी ओळख झाली होती. अलिराजपूर मधील बस स्टॅन्डजवळ मी त्या मुलाशी बोलत असताना, माझ्या कुटुंबीयांनी मला पाहिले. मुलाशी बोलते म्हणून कुटुंबीयांनी मला मारहाण केली. अशी माहिती मुलीने पोलिसांना दिली.