मागे घेण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत जयंत पाटलांचं सूचक विधान, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कामाचा धडाका लावला आहे. आरे, नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. विविध गुन्हे मागे घेण्यावरून कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी भाष्य करत सरकारचे समर्थन केले आहे.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, छोट्या गुन्ह्यांमध्ये अनावश्यक अकडले असेल तर त्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. छोटे गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात. कोणावरही अन्याय होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही सरकारची भूमिका असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच हुसेन दलवाई यांनी केलेल्या आरोपाला मी कोणालाही पाठिशी घालत नसल्याचे सांगितले.

भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना फडणवीस सरकारने दिलेली 310 कोटी रुपयांची बँक हमी बाबात सरकार विचार करत आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, कोणी पक्ष बदलला किंवा पक्षात नव्याने प्रवेश केला, तरी शेतकऱ्यांच्या हिताचे, दिलासा देणारे निर्णय घेण्यावर सरकारचा भर असेल. त्यामुळे त्यांच्या पक्षातला असो किंवा आमच्या पक्षातला असे निर्णय होताना काही करणार नाही असे त्यांनी म्हटलं आहे. भाजपने प्रकल्पांच्या फेरविचारावरून आरोप केले आहेत. भाजपला आरोप करण्यासाठी काहितरी हवे आहे. राज्याच्या जनतेच्या दृष्टीने उपयोगी प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Visit : Policenama.com