‘पुदीना’ सेवन केल्याने वाढते ‘इम्यूनिटी’, ‘हे’ 7 आहेत आश्चर्यकारक ‘फायदे’, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस संसर्ग वेगाने पसरत असल्याने लोक आपल्या घरात बंद आहेत. अतिशय महत्वाच्या कामासाठीच बाहेर पडत आहेत. कोरोना काळात इम्यूनिटी मजबूत ठेवण्यास सतत सांगितले जात आहे, कारण इम्यूनिटी कमजोर असेल तर हा आजार लवकर जडत आहे. पुदीना सुद्धा इम्यूनिटी वाढवण्यासाठी रामबाण उपाय आहे. एंटीऑक्सीडेंट्स, मेंथॉल आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी पुदिन्याचा वापर कसा करावा आणि त्याचे आणखी कोणते लाभ आहेत ते जाणून घेवूयात…

हे आहेत फायदे
1 शरीराची इम्यूनिटी वाढते.
2 यातील मेंथॉलमुळे शरीरातील अनावश्यक फॅट आणि टॉक्सिन्स बाहेर टाकले जाते.
3 वजन कमी होण्यास मदत होते.
4 पिंपल्सच्या समस्येपासून मुक्ती मिळते.
5 त्वचेवरील डाग दूर होतात, स्कीन इन्फ्लेमेशनमध्ये आराम मिळतो.
6 डँड्रफ आणि डोक्यात खाज असल्यास पुदीना पॅक लावा.
7 मुलांच्या डोक्यात उवा, स्काल्पमध्ये बॅक्टेरियामुळे झालेले इन्फेक्शन यातून पुदीना पॅकमुळे सुटका होते.

असा करा वापर
पुदीन्याचा चहा बनवून प्या. यासाठी पुदीन्याची 3-4 पाने वाटून पाण्यात उकळून घ्या. यामध्ये आवश्यक वाटल्यास मध मिसळू शकता. हा चहा नियमित सेवन करा.