उरुळी कांचन – जेजुरी रस्त्याचे काम त्वरित करा : आमदार अशोक पवार

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – उरुळी कांचन – जेजुरी मार्गावरील शिंदवणे परिसरात या रस्त्यावर पावसाच्या पाण्याने मोठे नुकसान झाले असल्याने या भागाच्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत असलेले नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांनी संबंधित ठेकेदाराला ताबडतोब दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावर त्वरित अंमलबजावणी करत तेथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. आमदार अशोक पवार यांचा कामाचा धडाका सुरु झाला असून त्यांची ओळख म्हणजे प्रत्यक्ष काम हीच होय.

आमदार पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पूर्व हवेलीतील गावाचा दौरा चालू केला. माझा सत्कार करण्यापेक्षा मला काम सुचवा असे त्यांनी सांगितले. गेली दोन दिवस या भागातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करताना शेतकरी बांधवांना धीर देतांना दिसले. आज उरुळीकांचन भागात असताना जेजुरी मार्गावरील शिंदवणे गावच्या परिसरात परतीच्या पावसाने रस्त्याचे मोठे नुकसान केले आहे. येथे बराच भराव वाहून गेला त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

यावर स्थानिक नागरिकांनी आपले गाऱ्हाणे आमदारांसमोर मांडले. त्यावर त्यांनी संबंधित ठेकेदाराला व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला काम करण्याच्या सूचना दिल्या. यावर ठेकेदाराने प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांत या रस्त्याचे तात्पुरती डागडुजी करुन मार्ग चालू करण्यात येणार आहे. परतीच्या पावसाने सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सर्वच रस्त्यांची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास