MLA Bhaskar Jadhav | चिपळूणमध्ये बोलताना भास्कर जाधवांच्या अश्रूंचा बांध फुटला, म्हणाले- ‘ज्या ज्या वेळेस माझ्यावर आघात होतो…’

चिपळूण : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) गेले चार दिवस चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. कुडाळचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्याविरोधात सुरु असलेल्या लाचलुचपत विभागाच्या (ACB) कारवाईवर कुडाळमध्ये त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला होता. यावेळी भास्कर जाधव यांनी भाषण केले होते. त्याच रात्री त्यांच्या घरावर हल्ला देखील झाला होता. त्यामुळे ते आता चर्चेत आहेत. शुक्रवारी पत्रकारांसोबत बोलताना भास्कर जाधवांना (MLA Bhaskar Jadhav) अश्रू अनावर झाले होते.

 

भास्कर जाधव यांनी कुडाळमधील भाषणात राणे कुटुंबियांचा (Rane Family) समाचार घेतला होता. यावेळी त्यांनी राणेंना बेडूक, कोंबडीचोर, चर्सी कार्टे आदी उपमा दिल्या होत्या. त्यानंतर आज (दि. 21) जाधव चिपळूणमध्ये आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडले आणि बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.

 

भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) म्हणाले, ज्या ज्या वेळेस माझ्यावर आघात होतो, त्या त्या वेळी गेल्या 35 – 40 वर्षांत माझे सहकारी माझ्या पाठिशी अशेच उभे राहत आले आहेत.
नवीन पिढीतील तरुण देखील माझ्यासोबत आहेत. त्यामुळे कोणतेही धाडस करताना, निर्णय घेताना,
मी अगोदर मनाला विचारतो की, माझी भूमिका योग्य आहे ना, एकदा मी निर्णय घेतला की त्यांच्या दुष्परिणामांची चिंता करत नाही.
भाजपमधील कुवत नसलेल्या लोकांकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका होत आहे.
गेली अडीच वर्षे भाजपमधील कुवत नसलेल्या, अधिकार नसलेल्या लोकांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

जेव्हा शिवसेनेवर (Shivsena) किंवा उद्धव ठाकरेंवर आरोप होतात, तेव्हा आम्हाला अनंत यातना होतात.
आमचे 40 सहकारी आम्हाला सोडून गेले आणि या सर्वाचा कडेलोट झाला.
अनेक प्रकारांनी शिवसेना संपविण्याचा भाजपने प्रयत्न केला. पण शिवसेना संपत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी 40 आमदार फोडले.
शिवसैनिक आतून धुमसतोय पण उद्धव ठाकरे त्याला शांत राहण्याचे आवाहन करत आहेत, असे भास्कर जाधव म्हणाले.

 

Web Title :- MLA Bhaskar Jadhav | bhaskar jadhav uddhav thackeray group mla slams bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ST Fare Hike | एसटीची दिवाळी हंगामी भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू, प्रवाशांच्या खिशावर 5 ते 75 रुपयांचा भार

Pune CP Amitabh Gupta On Traffic | पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचे मोठे पाऊल

Ajit Pawar | दर्जेदार विकासकामे उंटावरुन शेळ्या हाकून होत नाहीत, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना माहेरचा आहेर