आमदार जगताप आणि लांडगेंना योग्य वेळी, योग्य न्याय मिळेल : चंद्रकांत पाटील

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – संघटनेत काम करत असताना प्रत्येकाच्या कामाची नोंद ठेवली जाते. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या कामाची नोंद पक्षाने घेतली आहे. तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वर्षानुवर्षे पद नव्हते, याची दखल घेत बाळा भेगडे यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे योग्य वेळेस लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना न्याय मिळेल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील आज पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरात आले होते. पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या नुकत्याच उद्घाटन झालेल्या मध्यवर्ती कार्यालयास त्यांनी भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, प्रदेशचे महेश कुलकर्णी, उमा खापरे तसेच नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाने आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळवले. वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला पराभूत करण्याचा ‘भीम पराक्रम’ या नेत्यांनी केला होता. त्यानंतर लोकसभेतही चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून युतीच्या उमेदवारांना मोठे मताधिक्‍य दिले आहे.

परंतु पाच वर्ष संपत आली असताना देखील मंत्रीपदापासून या दोन नेत्यांना वंचित ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे जुन्या निष्ठावंतांना विविध महामंडळावर संधी देण्यात आली. नुकतेच मावळचे आमदार बाळा भेगडे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे जगताप आणि लांडगे यांना संधी कधी मिळणार याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, आम्ही सर्वजण संघटनेत काम करतो.

१० हजार डोळे आणि २० हजार कान हे प्रत्येकाने केलेले काम टिपत असतात. प्रत्येकाला योग्य वेळेस, योग्य न्याय दिला जातो. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला वर्षानुवर्षे मंत्रीपद मिळाले नव्हते. याची दखल घेऊन बाळा भेगडे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या कामाची दखल पक्ष घेत असून त्यांनाही ही पुढे संधी मिळेल असे ते म्हणाले.

आरोग्य विषयक वृत्त

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन