MLA Rohit Pawar | आमदार रोहित पवार मंत्रिपदासाठी इच्छुक? म्हणाले…

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) आज (शनिवारी) उस्मानाबाद जिल्ह्याच्या (Osmanabad News) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मंत्रिपदाबद्दलची इच्छा बोलून दाखवली आहे. ‘वरिष्ठ नेत्यांनी मंत्री म्हणून संधी दिली तर पदाला न्याय देणार’ असं म्हणत रोहित पवार यांनी मंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या विधानामुळे आता रोहित पवार यांना मंत्रिपद देण्याबाबत काही हालचाली सुरू आहे का? याबाबत चर्चा रंगली आहे. त्यावेळी रोहित पवार यांनी माध्यमांशी सवाद साधला.

 

रोहित पवार (MLA Rohit Pawar) म्हणाले, ”मी कोणत्याही पदासाठी काम केले नाही.
मी लोकांसाठी काम केलेलं आहे.
लोकांमध्ये राहून लोकांच्या हितासाठी जे होईल ते प्रामाणिकपणे काम केले आहे.
माझ्या मतदारसंघातील काम असेल किंवा मतदार संघाबाहेरील काम असेल.
जर नेत्यांना आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटलं की या कार्यकर्त्याला पद द्यावं,
ज्या पद्धतीने मी आमदार म्हणून माझ्या पदाला न्याय देतोय तसाच त्या पदाला न्याय देऊन लोकांच्या हिताचे काम नक्कीच करेल.”

दरम्यान, ”मराठवाडा विदर्भसह अन्य भागामधील अनेक तरुण आमदार काम करित आहेत ते मंत्री पदासाठी उत्सुक असल्याचे” रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर त्यांनी खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांच्या चित्रपटावरूनही प्रतिक्रिया दिली आहे.
”व्हाय आय किल गांधी” या चित्रपटात काही चुकीच्या गोष्टी व इतिहासाची मोडतोड केली असेल तर त्याला व्यक्तिश: विरोध करणार असल्याची भूमिका रोहित पवार यांनी बोलून दाखवली आहे.

 

Web Title :- MLA Rohit Pawar | ncp mla rohit pawar expressed his desire for a ministerial post at osmanabad discussion is going on

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा