अहमदनगर : संविधानाला डावलून नागरिकत्वासाठी रांगेत उभे करणे ‘दुर्दैवी’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकांना विविध कामांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये रांगेत उभे राहावे लागते. आता देशातील नागरिकांना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी संविधानाला डावलून रांगेत उभे राहण्याची वेळ येणे, हे दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना केली.

पवार म्हणाले की, कर्जमाफी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या पत्नीसह रांगेत उभे रहावे लागले. शिष्यवृत्तीसाठी युवकांना रांगेत थांबावे लागले. त्याच पद्धतीने आता नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी देशातील नागरिकांना संविधानाला डावलून रांगेत उभा करणे, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे.

देशात हक्कासाठी जर कोणी शांततेत आंदोलने, निदर्शने करीत असतील, तर त्यांच्यावर कोणीही हात उगारू नये. शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करण्यात आला. अनेक ठिकाणी लाठीमार करण्यात आला, या घटनांचा आम्ही निषेध करतो. देशात धडक कारवाई करण्यासाठी केंद्र शासनाकडून जी धडपड चालू आहे, ती दुर्दैवी असल्याची खंतही पवार यांनी व्यक्त केली.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/