शेतकर्‍यांच्या प्रश्नी अधिकारी, कर्मचार्‍यांना घेऊन आ. संदीप भैय्या क्षीरसागर जाणार थेट बांधावर !

पीक नुकसानीबाबत तहसिलमध्ये आज तातडीची बैठक ; तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक असणार फिल्डवर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बीड आणि शिरुर तालुक्यांतील शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, बाजरी, तुर आदी पिके पुर्णपणे वाया गेली असून पिकविमा भरलेल्या शेतकर्‍यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. पिकविमा न भरलेल्या शेतकर्‍यांमध्ये मदतीसाठीच्या अर्जाबाबत संभ्रम असून यासह शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नी अधिकारी, कर्मचार्‍यांना घेऊन आ. संदिप भैय्या क्षीरसागर थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाणार आहेत. त्या अगोदर तहसिल कार्यालयात आज सकाळी 11 वा. तहसिलदार, तालुकाकृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी यांच्यासोबत शेतकर्‍यांच्या पिकांच्या नुकसानीसंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. त्याच बरोबर शेतकरी बांधवांची अडचण होऊ नये, त्यांना गाव पातळीवरच अर्ज जमा करण्यात यावेत यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना गावा-गावात हजर राहण्याचे आदेश आ. संदीप क्षीरसागर यांनी दिले आहेत.

परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे, शेतातील बाजरी, सोयाबीन, कापुस यासह अन्य पिके अक्षरश: उध्वस्त झाली आहेत. सुरूवातीला कशाबशा पावसावर लावलेल्या कापसाची उंची खुंटली होती. त्या कापसाला आलेले चार-पाच बोंडाचे नुकसान होवून कापसाच्या वाती झाल्या आहेत. तर बाजरीला कोंब फुटले आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारनं तातडीने मदत देण्याची गरज आहे. पिकविमा भरलेल्या शेतकर्‍यांना नुकसानीसंदर्भात अर्ज करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. संबंधित अधिकारी शेतकर्‍यांना भेटत नाहीत. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आ. संदिप क्षीरसागर यांनी तातडीची बैठक दि. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय बीड येथे बोलावली आहे. या बैठकीनंतर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तहसिलदार या सर्वांना सोबत घेत बीड मतदार संघातील नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांची पाहणी व पंचनाम्यासाठी स्वत: आ. संदिप क्षीरसागर गावा-गावात जाणार आहेत. शेतकर्‍यांना तातडीने पिकविमा जोपर्यंत मंजूर होत नाही. त्याचबरोबर ज्या शेतकर्‍यांनी विमा भरला नाही, परंतू नुकसान झाले आहे. अशा शेतकर्‍यांनाही ठोस मदत शासन स्तरावरुन होत नाही, तोपर्यंत या प्रश्नी पाठपुरावा करत राहु वेळ पडल्यास आक्रमक भुमिका घेण्याचा पवित्राही आ. संदिप क्षीरसागर यांनी घेतला आहे.

विजयाच्या दिवशीच प्रशासनाला पत्र
बीड विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयाच्या दिवशीच बीड मतदार संघातील शेतकर्‍यांच्या पिकाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करुन मदत देण्यात यावी, असे पत्र आ.संदिप क्षीरसागर यांनी उपविभागीय अधिकारी, बीड यांच्यामार्फत बीड आणि शिरुर तहसिलदारांना दिले होते. त्यावर तातडीने आदेशही निघाले. यावरुन शेतकर्‍यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व दिसून येत आहे.

तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक गाव पातळीवरच असणार !
आ. संदीप क्षीरसागर यांनी तातडीची बैठक बीड तहसील कार्यालयात आज सकाळी 11 वा. बोलावली आहे, या बैठकीला अधिकारी असणार आहेत तर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी गाव पातळीवर उपस्थित राहून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारावेत कोणीही वंचीत राहता कामा नये अशा सुचना आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी दिल्याने शेतकऱ्यांना बीडला येण्याची गरज पडणार नाही. प्रशासन शेतकऱ्यांच्या दारी येणार आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या