MLA Siddharth Shirole | आमदार शिरोळे यांच्याकडे घोराडोंगरी मतदारसंघाची जबाबदारी

पुणे – MLA Siddharth Shirole | भारतीय जनता पक्षाच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाने मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील घोराडोंगरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर सोपवली आहे. (MLA Siddharth Shirole)

यापूर्वी पश्चिम बंगाल, गोवा, गुजरात आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारसंघांच्या जबाबदाऱ्या पक्ष नेतृत्वाने आमदार शिरोळे यांच्यावर सोपविल्या होत्या. मध्यप्रदेशातील आगामी निवडणुका लक्षात घेऊन ही नवी जबाबदारी आमदार शिरोळे यांच्यावर सोपवली आहे.

पक्षाच्या विधानसभास्तरीय कोअर समितीची बैठक बैतुल जिल्ह्यातील शहापूर विश्रामगृह येथे रविवारी झाली. केंद्रीय नेतृत्वाचे प्रतिनिधी आणि प्रवासी कार्यकर्ता म्हणून तेथील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शिरोळे यांचे स्वागत केले.

विविध निवडणुकांमध्ये केलेल्या कामांचे अनुभव शिरोळे यांनी बैठकीत सांगितले. बूथ कमिटीच्या कामावरही तपशीलवार चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस कमलेश सिंह, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव चाडोकर, जिल्हा कोषाध्यक्ष कांतीलाल यादव, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत गावंडे यांच्यासह सर्व मंडल अध्यक्ष व घोराडोंगरी विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | ‘फीअर ऑफ फेल्युअर’ घालवण्यासाठी सायन्स कट्टा उपयुक्त

Onion Export Duty | टोमॅटोनंतर महागणार नाही कांदा! भाव रोखण्यासाठी सरकारने केले ‘हे’ काम

Dr. Sunita More | डॉ. सुनीता मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर सरचिटणीस पदी नियुक्ती

Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाची सांगता

Congress Leader Mohan Joshi | स्व. राजीव गांधी जयंतनिमित्त सद्भावना क्रीडा ज्योतीचे आयोजन

20 August Rashifal : कर्क, सिंह आणि मीनसह या २ राशीवाल्यांची होईल इच्छापूर्ती, वाचा दैनिक राशीभविष्य

Maharashtra Police News | सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट,
मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याला अटक; हत्येचे कारण आले समोर