MLA Sunil Shelke On NCP Rohit Pawar | अजित पवारांच्या आधी रोहित पवारच भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही होते; आमदार सुनील शेळकेंचा मोठा गौप्यस्फोट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Sunil Shelke On NCP Rohit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आधी आमदार रोहित पवारांनी भाजपमध्ये (BJP) जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. आता आम्ही सत्तेत गेल्यावर ते अजित पवारांची जागा घेऊ पाहताहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट अजित पवारांचे कट्टर आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. अजित पवार यांच्या सोबत गेलेले आमदार हे स्वार्थासाठी गेले आहेत, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर असताना केला होता. यानंतर अजित पवारांसोबत गेलेले नेते रोहित पवारांच्या टीकेला उत्तर देताना दिसत आहे. (MLA Sunil Shelke On NCP Rohit Pawar)

सुनील शेळके म्हणाले, 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 22 जून 2022 चा तो दिवस होता. त्या दिवशी रोहित पवार पक्षातील मंत्री आणि नवीन आमदारांना घेऊन अजित पवारांकडे गेले. मात्र त्यांनी शरद पवारांची परवानगी आणायला सांगताच रोहित पवार आम्हाला साहेबांकडेही घेऊन गेले, असा खुलासा आमदार शेळके यांनी केला. त्यामुळे रोहित पवारांनी आमचा स्वार्थ काढू नये असा सल्लाही शेळके यांनी दिला. (MLA Sunil Shelke On NCP Rohit Pawar)

आता आम्ही सत्तेत गेल्यानंतर रोहित पवार शरद पवारांच्या अधिक जवळ जाऊ पाहत आहेत. परंतु पवार साहेबांच्या जवळचे फक्त अजित दादाच असू शकतात इतर कोणत्याही दादांना ते जमणार नाही, असं म्हणत रोहित पवार हे अजित दादांची जागा घेऊ पाहत असल्याचा ही गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला आहे.

सुनील शेळके पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही तर तो परिवार आहे.
परंतु, मागील काही दिवसांपासून आमच्यावर अनेक आरोप केले जात आहेत.
दोन महिने आम्ही सगळे आरोप ऐकत आहोत. राष्ट्रवादी हे परिवार असल्यामुळे परिवारासारखं राहिलं पाहिजे.
शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार घेत शरद पवार आणि अजित पवार आपापल्या पद्धतीने काम करत आहेत.
सगळ्यांना न्याय कसा देता येईल याचा विचार करुन त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौऱ्याबाबत दिले स्पष्टीकरण; कायदेतज्ज्ञांच्या घेतल्या भेटी

Bachchu Kadu On BJP | ‘एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यास…’, बच्चू कडूंचा भाजपला इशारा

Weather Forecast Maharashtra | राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट