MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे दुसऱ्यांदा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मनपा आयुक्त विक्रम कुमारांसोबत केला होता पाहणी दौरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात अनेक मंत्री, नेत्यांना कोरोनाची लागण (Corona Infection) होत. पुण्यातील वडगावशेरी (Wadgaon Sheri) विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती स्वत: आमदार टिंगरे यांनी ट्विट करुन दिली.

मंगळवारी आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक (Corporator) यांच्यासोबत येरवडा राजीव गांधी रुग्णालय (Yerawada Rajiv Gandhi Hospital), धानोरी (Dhanori), लोहगाव (Lohegaon) भागाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी आमदार टिंगरे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी असल्याने त्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

आमदार सुनिल टिंगरे यांनी ट्विट करुन माहिती देताना सांगितले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Test Positive) असून, सौम्य लक्षण आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनी कृपया स्वत:ची चाचणी करुन घ्यावी. याबाबत टिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. थोडीशी कणकण वटली म्हणून चाचणी केल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title : MLA Sunil Tingre | MLA Sunil Tingre had a second visit with ‘Corona’ positive,
Pune Municipal Commissioner Vikram Kumar and mla tingre Inspection tour in lohegaon are

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात