भाजपा आमदारासह कुटुंबातील 6 जणांना ‘कोरोना’ची बाधा !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सांगली- मिरज विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश खाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील 8 सदस्यांनाही संसर्ग झाल्याची माहिती मनपा उपायुक्तांनी दिली आहे.

सांगली महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. दरम्यान, आमदार खाडे यांना बुधवारी कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या आमदार खाडे यांनी प्रकृती उत्तम असून पूर्णपणे सुरक्षित असल्याचा संदेश दिला आहे. त्याशिवाय कार्यकर्त्यांनी काळजी करुन नये मात्र सुरक्षेसाठी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

आमदार खाडे यांचे स्वीय सहायक आणि अंगरक्षक यांची कोरोना तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आली आहे. त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा जणांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like