ताज्या बातम्यामुंबईराजकीय

MNS Chief Raj Thackeray Aurangabad Sabha | राज ठाकरे औरंगाबादच्या सभेपूर्वी पुण्यात घेणार 100 पुरोहितांचे आशीर्वाद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray Aurangabad Sabha | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद (Aurangabad) मधील सभेला प्रशासनाने सशर्त परवानगी (Conditional Permission For MNS Sabha) दिली आहे. महाराष्ट्र दिनी (Maharashtra Din) राज ठाकरे यांची सभा होणार असून यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. औरंगाबादला जाण्यापूर्वी ते पुण्यात आले आहेत. त्यापूर्वी म्हणजे उद्या (शनिवार) राज ठाकरे यांच्या पुण्यातील घरामध्ये 100 पुरोहित (Purohit) येणार असल्याची माहिती आहे. हे पुरोहित राज ठाकरे यांना औरंगाबादच्या सभेपूर्वी आशीर्वाद (Priest Blessing) देणार आहेत. (MNS Chief Raj Thackeray Aurangabad Sabha)

 

शनिवारी सकाळी 8 वाजता हे 100 पुरोहित राज ठाकरे यांच्या पुण्यातील (Pune) निवासस्थानी येणार आहेत. औरंगाबादच्या सभेपूर्वी मंत्रोच्चारासह राज ठाकरे यांना आशीर्वाद देणार आहेत. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रर्थना देखील केली जाणार आहे. (MNS Chief Raj Thackeray Aurangabad Sabha)

 

राज्यात सध्या हिंदुत्त्वाच्या (Hindutva) मुद्यामुळे चर्चेत असलेले राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेची सर्वत्र चर्चा आहे. या सभेपूर्वी राज ठाकरे आज पुण्यात (Pune) दाखल झाले आहेत. पुढील दोन दिवस ते पुण्यात मुक्कामी असणार आहेत. पुण्यातूनच ते औरंगाबादच्या सभेला जाणार आहेत. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामात राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या (Pune MNS) पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील सभेला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यामध्ये पोलीस उपायुक्त (DCP) 3, सहायक पोलीस आयुक्त (ACP) 6, पोलीस निरीक्षक (Police Inspector) 30,
इतर 300 अधिकारी आणि 2 हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
तसेच औरंगाबाद ग्रामीण (Aurangabad Rural), जालना (Jalna), अहमदनगर (Ahmednagar),
पुणे यासह गरज पडल्यास इतर जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवली जाण्याची शक्यता आहे.
याशिवाय काही एसआरपीएफच्या (SRPF) तुकड्या देखील तैनात करण्यात येणार आहेत.
तसेच सीआयडीचं (CID) एक विशेष पथक सभेआधीपासून सभा संपल्यानंतर विशेष लक्ष ठेवणार आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray Aurangabad Sabha | MNS chief raj thackeray will get blessings from 100 priest at pune for aurangabad rally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Amruta Fadnavis | ‘मी अमृता फडणवीस यांना ट्विटरवर फॉलो करत नाही’ – सुप्रिया सुळे

 

Jalgaon Crime | नारदाच्या गादीवर बुटासहीत पाय ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदायाची मागितली जाहीर माफी, म्हणाले…

 

CBI Arrest SP And Inspector of Central GST In Kolhapur | 50 हजाराच्या लाचप्रकरणी GST अधीक्षकासह निरीक्षकास अटक; कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये CBI ची कारवाई

Back to top button