‘फक्त शॅडो कॅबिनेटच्या घोषणेनं रडत राऊतची तंतरली’, मसनेचा संजय राऊतांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारच्या कारभारावर वचक ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी पक्षाच्या शॅ़डो कॅबिनेटची घोषणा केली. पक्षाने पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना या शॅडो कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आले आहे. मनसेच्या या शॅ़डो कॅबिनेटवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामानातून खिल्ली उडवण्यात आली आहे. मात्र, या टीकेला आता मनसेनेही उत्तर दिलं आहे. शॅ़डो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली, अशा शब्दात मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीटद्वारे शिवसेनेला उत्तर दिले आहे.

मसेचा 14 वा वर्धापनदिन सोहळा नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. मराठीसोबतच हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर मनसेचा हा पहिलाच वर्धापनदिन होता. या मेळाव्यात मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी पक्षाच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. मनसेचे हे प्रति मंत्रिमंडळ सरकारच्या चुकीच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

मनसेच्या या शॅडो कॅबिनेटवर सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली. शॅडो वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच अशा शब्दात सामनातून मनसेच्या शॅडो कॅबिनेटची खिल्ली उडवण्यात आली. तसेच शॅडो मुख्यमंत्री आणि शॅडो राज्यपालांची नेमणूकही व्हायला हवी होती, असा टोला सामनातून मनसेच्या शॅडो कॅबिनटवर लगावण्यात आला आहे.

सामनातून झालेल्या टीकेला मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. अमेय खोपकर ट्विटमधून शिवसेनेला विशेषत: खासदार संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आता कुठे सुरू झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात ‘मोठी तिची सावली’ हा अग्रलेख लिहायला लागू नये असे काम महाखिचडीने करवं या सदिच्छा, असे अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.