मनसे विधानसभा निवडणूक लढवणार ! सूत्रांची माहिती

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या निवडणुकीत आघाडी घेतली असून यामध्ये काँग्रेसने आपली उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळत आहे.

मनसे या विधानसभा निवडणुकीत 100 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मिळत आहे. आज राज ठाकरे यांनी मुंबईतील त्यांच्या निवास्थानी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी तयारी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे. सोलापूर, पंढरपूर, हिंगोली, ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, तसेच औरंगाबादमधील जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

तसेच राज ठाकरे यांनी उमेदवारांची यादी देखील मागवली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांचा आघाडीत जाण्याचा मार्ग देखील बंद झाल्याचे दिसून येत आहे. आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून राज ठाकरे यांचा कोणताही विचार त्या ठिकाणी न आल्याने ते आता एकटेच निवडणूक लढवणार असल्याचे नक्की झाले आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्याकडून याविषयी कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. मात्र पक्षाचे कार्यकर्ते याची आतुरतेने वाट पाहत असून राज ठाकरे कधी याची अधिकृत घोषणा कारतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Visit – policenama.com 

You might also like