नवा झेंडा ! नवीन अजेंडा, ‘शिवमुद्रा’ असलेल्या ‘मनसे’च्या नव्या भगव्या झेंडयाचं राज ठाकरेंच्या उपस्थितीत ‘अनावरण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गोरेगाव येथे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या अधिवेशनाला सुरुवात झाली यावेळी राज ठाकरेंनी स्वतः मनसेच्या नवीन ध्वजाचे अनावरण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांच्या या अधिवेशनाची चर्चा होती.

या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. विशेष म्हणजे आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे हाच मुहूर्त साधत मनसेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनेक कार्यकर्ते रस्त्यामध्ये ट्राफिक जॅममध्ये अडकलेले असताना राज ठाकरेंनी केवळ यावेळी ध्वजाचे अनावरण केले तर संध्याकाळी भाषण स्वरूपात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे देखील स्पाष्ट केले.

कसा आहे मनसेचा नवीन झेंडा
खरं तर मनसेच्या या झेंड्यांची सर्व मीडियाने या आधी देखील खूप चर्चा केली आहे. अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण भगव्या असलेल्या या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे तर खाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील लिहिलेले आहे.

शिवसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली हात मिळवणी लक्षात घेता मनसेकडून आता हिंदुत्वाची पोकळी भरून काढण्याचा प्रयन्त केला जातोय. मात्र आज संध्याकाळी राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

फेसबुक पेज लाईक करा –