मनसेची 32 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, रोहित पवारांसह राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरूध्द देखील उमेदवार

पुण्यातील आंबेगाव, शिरूर, खेड-आळंदी, पुणे-कॅन्टोन्मेंट, शिरूर, पुरंदर आणि भोर मध्ये उमेदवार जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 32 उमेदवारांची तिसरी यादी आज (गुरूवार) संध्याकाळी जाहीर केली आहे. यापुर्वी मनसेने उमेदवारांच्या 2 याद्या जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई, पुणे, ठाणे आणि इतर जिल्हयातील विधानसभा मतदार संघाचा समावेश होता. दरम्यान, कर्जत-जामखेड मतदार संघातून मनेसेने उमेदवार दिला आहे. तिथे राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे राष्ट्रवादीकडून उमेदवार आहेत. त्यांच्याविरूध्द मनसेकडून समता इंद्रकुमार भिसे या निवडणूक लढवणार आहेत.

तसेच खेड-आळंदी, पुणे कॅन्टामेंट, पुरंदर आणि पुणे जिल्हयातील इतर ठिकाणी देखील मनेसेने उमेदवार दिले आहेत. दरम्यान, मनेसेची पहिली यादी ही 27 तर दुसरी यादी ही 45 उमेदवारांची होती. आता मनसेने 32 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे एकूण 104 उमेदवारांची घोषणा आत्‍तापर्यंत झाली आहे.

मनसेने जाहीर केलेल्या उमेदवारांचे मतदार संघ आणि त्यांची नावे –
1. भांडूप (पश्‍चिम) – संदीप जळगांवकर
2. विक्रोळी – विनोद शिंदे
3. मुलुंड – हर्षदा राजेश चव्हाण
4. वडाळा – आनंद प्रभू
5. उरण – अतुल भगत
6. पिंपरी – के.के. कांबळे
7. मिरा-भाईंदर – हरीष सुतार
8. बार्शी – नागेश चव्हाण
9. सांगोला – जयवंत बगाडे
10. कर्जत-जामखेड – समता इंद्रकुमार भिसे
11. राजापूर – अविनाश सौंदाळकर
12. बदनापूर – राजेंद्र भोसले
13. मुरबाड – अ‍ॅड. नितीन देशमुख
14. विक्रमगड – सौ. वैशाली सतीश जाधव
15. पालघर – उमेश गोवारी
16. ओवळा – माजिवडा – संदीप पाचंगे
17. उमरगा – जालिंदर कोकणे
18. पुणे-कॅन्टोन्मेंट – श्रीमती मनिषा सरोदे
19. खेड-आळंदी – मनोज खराबी
20. आंबेगाव – वैभव बाणखेले
21. शिरूर – कैलास नरके
22. दौंड – सचिन कुलथे
23. पुरंदर – उमेश जगताप
24. भोर – अनिल मातेरे
25. चाळीसगांव – राकेश जाधव
26. वसई – प्रफुल्‍ल ठाकूर
27. डहाणू – सुनिल ईभान
28. देवळाली – सिध्दांत लक्ष्मण मंडाले
29. लातूर ग्रामीण – अर्जुन वाघमारे
30. भंडारा – श्रीमती पूजा ठक्‍कर
31. वरोरा – रमेश महादेवराव राजूरकर
32. भुसावळ – निलेश अमृत सुरळकर

Visit : Policenama.com