Mohammed Shami | मोहम्मद शमीसोबत ‘या’ अभिनेत्रीला करायचंय लग्न; दुसरी पत्नी बनण्यास तयार, पण ठेवली ‘ही’ अट

मुंबई : क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू मोहम्मद शमी (Mohammed Shami) याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शमीला चक्क अभिनेत्री पायल घोष (Actress Payal Ghosh) हिने लग्नाची ऑफर दिली आहे. यामुळे शमी आणि पायल चांगलेच चर्चेत आले आहेत. पायल याआधीही तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिने खुलेआम शमीला लग्नासाठी प्रपोज केले आहे. (Mohammed Shami)

पायल घोषने तिच्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, शमी, तुझे इंग्रजी सुधार, मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे. पायलचे हे ट्विट खुपच व्हायरल झाले असून सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अद्याप शमीने या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यात उघडपणे शमीची (Mohammed Shami) दुसरी पत्नी बनण्याची इच्छा पायलने व्यक्त केली आहे. आता शमी तिच्या या प्रस्तावावर काय बोलतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१९९२ साली कोलकाता येथे पायल घोषचा जन्म झाला. सेंट पॉल मिशन स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण झाले.
तिने स्कॉटिश चर्च कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे.
अभिनयाची आवड असल्याने ती कॉलेजमध्ये असताना घरातून पळून मुंबईत आली. त्यानंतर तिचे अभिनय क्षेत्रातील करियर सुरू झाले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुनी 500 ची नोट मागण्याच्या बहाण्याने रोकड लंपास, स्वारगेट परिसरातील घटना

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना डिवचले, म्हणाले – ’40 वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, पण…’

MLA Ravindra Dhangekar | ललित पाटील ड्रग्स केस : …तर पोलीस आयुक्तांच्या घराबाहेर आंदोलन करणार, आमदार रविंद्र धंगेकरांचा इशारा

Chhatrapati Sambhajinagar Accident News | दिवाळी गिफ्ट अन् मिठाई घरी घेऊन जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; छ. संभाजीनगर येथील घटना