मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँनं शेअर केला ‘हुक्का’ व्हिडीओ, कुणी म्हणालं नवी राखी सावंत तर कुणी ओलांडल्या ‘मर्यादा’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी वेगळे राहतात. आपापल्या आयुष्यात ते सध्या व्यस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून हसीन आपल्या काही व्हिडीओमुळं चर्चेत येत आहे आणि ट्रोल होत आहे. असं असलं तरीही तिनं ट्रोलर्सला फाट्यावर मारून खूप बोल्ड व्हिडीओ शेअर केला होता आणि ट्रोलर्ससाठी तिनं खास मेसेजही दिला होता. हसीन पुन्हा एकदा हसीन हुक्का व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे. या व्हिडीओसाठी हसीन ट्रोल होताना दिसत आहे.

हसीन जहाँनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात मैत्रिंणीसोबत हुक्का एन्जॉय करत आहे. मधे मधे त्या एकमेकींच्या गळ्यात पडताना दिसत आहे. असं वाटत आहे की, हा एखाद्या पबमधील व्हिडीओ आहे. बॅकग्राऊंडला गाणीही सुरू आहेत.

https://twitter.com/30Kumaar/status/1271450938633584652?s=20

व्हिडीओनंतर हसीन जहाँ झाली ट्रोल

हसीनच्या मस्ती करतानाच्या व्हिडीओनंतर ती काही लोकांच्या निशाण्यावर आली आहे. अनेकांनी तिच्या व्हिडीओवर कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. काहींनी कमेंट करताना अगदी मर्यादाही ओलांडल्या आहेत. अनेकांनी शमीला सपोर्ट केला आहे. हसीन आधीही बोल्ड व्हिडीओनं ट्रोल झाली आहे. परंतु ती कोणाला जुमानत नाही असं दिसतंय.

https://twitter.com/30Kumaar/status/1271451162642964480?s=20

https://twitter.com/30Kumaar/status/1271451366662328322?s=20

https://twitter.com/30Kumaar/status/1271451640680402945?s=20

https://twitter.com/30Kumaar/status/1271451862143832064?s=20