पुण्यात डॉक्टरकडून महिलेला मोबाईलवर अश्लील मेसेज, विनयभंगाचा FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा पेठेतील प्रसिद्ध सुर्या हॉस्पिटलमध्ये मुलाला उपचारासाठी दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरने सतत मुलाला चेकअप करण्याचे बहाण्याने रूममध्ये येऊन महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी डॉ. अनिरुद्ध (वय 30) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 30 वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार 1 ते 14 जानेवारी या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा पेठेत सुर्या हॉस्पिटल आहे. दरम्यान पिडीत महिलेच्या मुलाला पोळले होते. त्यामुळे त्याला उपचारासाठी या रुग्णालयात दाखल केले होते. त्यासाठी त्यांनी प्राव्हेट रूम केली होती. त्याचे चेकअप करण्यासाठी डॉ. अनिरुद्ध हे रूममध्ये येत असत. मात्र त्यानंतर डॉक्टर सतत रूममध्ये येत असत. तसेच त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. तर मोबाईलवर अश्लील मेसेज करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास फरासखाना पोलिस करत आहेत.