Monsoon Diet | पावसाळ्यात आरोग्यदायी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा करा समावेश, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Monsoon Diet | पावसाळ्यात डॉक्टर नेहमी आरोग्यदायी राहण्यासाठी आहारात व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. सोबतच रोज सकाळी ग्रीन टी किंवा काढा पिण्याचा सल्ला देतात. जर तुम्हाला सुद्धा निरोगी राहून मान्सूनचा (Monsoon Diet) आनंद घ्यायचा असेल तर या पदार्थांचा तुमच्या आहारात समाावेश करा.

1. लिंबू आणि हिरवी मिरची
पावसाळ्यात आहारात लिंबू आणि हिरव्या मिरचीचा समावेश केल्याने शरीर बॅक्टेरियापासून सुरक्षित राहते. सोबत यातील पोषकतत्वामुळे पाण्यातून होणारे आजार दूर राहतात. शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन सी मिळते, इम्यूनिटी वाढते.

2. हे पदार्थ कमी करा
पावसाळ्या ताक, लस्सी, भात, दही इत्यादीचे प्रमाण कमी करा. यामुळे पाण्याची मात्रा असंतुलित होऊ शकते.

3. हंगामी भाज्या खा
पावसाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या बाजारात येतात. विशेषता दुधीभोपळा, भोपळा, कारले इत्यादीचे सेवन करा. यातून शरीराल व्हिटॅमिन ए, सी, ई आणि बीटा कॅरोटिन, फॉलिक अ‍ॅसिड, फायबर मिळते. रोग प्रतिकारशक्ती वाढते.

4. तेलकट, मसालेदार पदार्थ टाळा
पावसाळ्यात जंक फूड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. यामुळे शरीराचे तापमान वाढते, रक्तप्रवाह प्रभावित होतो.

Web Title :- Monsoon Diet | include these things in your diet to stay healthy during monsoon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Crime | शिरूरचे माजी सभापती प्रकाश पवार यांच्यावर गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Gold Medal in Olympics | हरियाणाच्या सुपुत्राने घडवला इतिहास, वाचा Neeraj Chopra ची पूर्ण प्रोफाईल

Raj Kundra Pornography Case | ‘शिल्पा शेट्टीला आवडतात अश्लील व्हिडीओ’, ‘या’ अभिनेत्रीचा खळबळजनक दावा