मी लष्करात असताना १००पेक्षा अधिक स्ट्राईक झाले ‘या’ नेत्याचा मोदींवर निशाणा

पतियाळा : वृत्तसंस्था – पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकच्या दाव्यावरून टीका केली आहे. जेव्हा १९६४ ते १९६७ मध्ये मी वेस्टर्न कमांडर होतो. त्यावेळी जवळपास १०० स्ट्राईक झाले आहेत. मोदींनी फक्त त्या स्ट्राईकला सर्जिकल स्ट्राइक असं नाव दिलं आहे. आम्ही याला क्रॉस बॉर्डर रेड म्हणतो. असे अमरिंदर सिंह यांनी एका टीव्ही वाहिणीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे सांगितले.

भाजपाला इतिहासाची माहिती नाही
यावेळी बोलताना अमरिंदर सिंग म्हणाले, मोदी म्हणतात, सीमेपलिकडे जाऊन पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला. पण मोदींना इतिहास माहीत करून घेण्याची गरज आहे. भाजपाला इतिहासाची माहिती नाही. ज्याला लष्कराचा इतिहास माहिती आहे. त्याला माहितीच असेल की, आधीही बऱ्याचदा सर्जिकल स्ट्राइक झाले आहेत.

ही तुमची सेना नाही भारताची सेना…
यावेळी पुढे बोलताना अमरिंदर सिंग म्हणाले, यापूर्वी देखील स्ट्राईक झाले आहेत. १९४७ मध्ये पंतप्रधान कोण होते ? १९६२ मध्ये कोण पंतप्रधान होते ? असा सवाल करीत अमरिंदर म्हणाले इंदीरा गांधींनी हे सर्व केले पण त्यावेळी भारतीय सेना आणि फील्ड मार्शल सॅम मानेकशाची मी आभारी आहे. असे म्हणत त्यांनी दुसऱ्यांना श्रेय दिलं. पण हे व्यक्ती म्हणतात हे मी केलं ? तुम्ही कोण आहात ? ही तुमची सेना नाही. ती भारताची सेना आहे. एकतर त्यांच्याकडे ज्ञानाचा आभाव आहे किंवा ते जाणूनबुजून असे बोलत असावेत. असा टोला सिंग यांनी मोदींना लगावला आहे.