‘समलिंगी’ संबंधात होती आई, समाजात कुटुंबाला नव्हते स्थान, तरीही मुलगी झाली ‘पंतप्रधान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ती अवघ्या ३४ वर्षांची आहे, परंतु फिनलँडच्या पंतप्रधानपदासाठी निवडली गेली आहे. सना मरीन ५७ वर्षीय पंतप्रधान एन्टी रिने यांची जागा घेणार आहेत. एक महिला असूनही, इतक्या अल्पावधीत राजकारणाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचलेल्या सनाचे बालपण काही चांगले नव्हते आणि विशेष म्हणजे तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते.

समलैंगिक रिश्ते में रहीं मां, फैमिली को नहीं मिलती थी इज्जत, बेटी बनी PM

सना मरीन बालपणात आपल्या आईबरोबर भाड्याच्या घरात रहात होती. त्यांनतर सना मरीन यांची आई एका महिलेसोबत समलिंगी नात्यात अडकली. त्यामुळे समाजात त्यांच्या कुटुंबाला कुणीही आदर सन्मान देत नव्हते.

समलैंगिक रिश्ते में रहीं मां, फैमिली को नहीं मिलती थी इज्जत, बेटी बनी PM

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सना म्हणाली होती, ‘मी माझ्या कुटुंबाबद्दल उघडपणे बोलू शकत नव्हते. त्यामुळे मला माझे अस्तित्व कधी जाणवले नाही आणि मी स्वतःला अयोग्य मनू लागली होती.’

समलैंगिक रिश्ते में रहीं मां, फैमिली को नहीं मिलती थी इज्जत, बेटी बनी PM

सना मित्रांसोबत कधी बाहेर जाऊ शकली नाही तिला तो आनंद कधी घेताच आला नाही. तसेच तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. आणि विशेष म्हणजे सना ही विद्यापीठात शिकणारी तिच्या कुटुंबातील पहिलीच मुलगी होती. सना म्हणाली की तिच्या आईने शिक्षणाच्या बाबतीत तिला खूप मदत केली आणि तिने मला खात्री दिली की मला जे करायचे आहे ते मी करू शकते.

समलैंगिक रिश्ते में रहीं मां, फैमिली को नहीं मिलती थी इज्जत, बेटी बनी PM

फिनलँडच्या पंतप्रधानपदावर सना मरीन ही सोशल डेमोक्रॅटिक पक्षातर्फे निवडून गेलेली आहे. या प्रसंगी सना मरीन म्हटली, ‘मी माझे वय आणि माझे लिंग याबद्दल कधीही विचार केला नाही. मी नेहमी अशा गोष्टींचा विचार केला आहे त्यामुळे मी राजकारणात आले आणि लोकांचा विश्वास जिंकला.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like