समुद्रकिनाऱ्यावरचे फोटो शेअर करत मौनी रॉय म्हणाली- ‘सहजच पुस्तक ओपन केलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन अभिनेत्री मौनी रॉय सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशचा आनंद घेत आहे. अशा मौनी आपल्या एका नव्या फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. या फोटोंमध्ये मौनी कमालीच बोल्ड दिसत आहे. चाहत्यांना आपल्या बोल्डनेसनं तिनं घायाळ केंल आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

फोटो दिसत आहे की, मौनी समुद्रकिनारी बसली आहे. समुद्राकिनारी बेडसारखा सेटअप दिसत आहे. मौनीच्या आजूबाजूला व्हाईट उशा आहेत. या फोटोशुटची खास बात अशी की, मौनी या फोटोत न्यूड आहे. एका व्हाईट पांघरूणानं तिला स्वत:ला कव्हर केलं आहे. मौनीच्या फोटोनं तर चाहत्यांचं लक्ष वेधलं आहेच. परंतु मौनीचं कॅप्शनही खूप वेगळं आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये मौनी म्हणते, “सहजच पुस्तक ओपन केलं”

मौनीच्या या न्यूड फोटोशुटचं चाहत्यांकडून कौतुक होताना दिसत आहे. अनेकानी मैनीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी कमेंट करत मौनीच्या लुक आणि सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच मौनी ब्रह्मास्त्र या आगामी सिनेमा दिसणार आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.