मोदी-योगी समाजासाठी ‘कलंक’, भाजपच्या ‘या’ मंत्र्यांचा खळबळजनक व्हिडिओ ‘व्हायरल’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशचा गँगस्टर विकास दुबे याच्या एन्काऊंटरप्रकरणी भाजप मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आले त्यावर त्यांनी उत्तर देताना जे विधान केले त्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या भाजप नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे तिघेही समाजासाठी कलंक असल्याचे खळबळजनक विधान केले. दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे, विशेष म्हणजे त्यांचा हा व्हिडीओ काँग्रेसचे नेते शेअर करत असल्याचे समोर येत आहे.

हे भाजप नेते म्हणजे शिवराज सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री आणि सिंधिया समर्थक तुलसी सिलावट हे आहेत. त्यांना विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी म्हटले की ही घटना समाजासाठी प्रेरणादायी आहे. मात्र यानंतर त्यांनी देशाचे पंतप्रधान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना समाजासाठी कलंक असल्याचे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या दरम्यान काँग्रेसने भाजपची फिरकी घेत म्हटले की, ‘अखेर सत्य ओठांवर आले.’

व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असताना आणि वाद वाढत असल्याचे समजताच तुलसी सिलावट यांनी स्पष्टीकरण दिले की व्हिडीओसोबत छेडछाड झाली आहे. ते म्हणाले मी पंतप्रधान आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले होते. विकास दुबे हा समाजासाठी कलंक होता असे मी म्हटले होते. मात्र या व्हिडीओसोबत काँग्रेसने छेडछाड केली असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी म्हटले की या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल.

दुबे’जी‘

तर दुसरीकडे हा व्हिडिओ व्हायरल होत असताना इंदूरमध्ये भाजप खासदार शंकर ललवाणी यांनी गँगस्टर विकास दुबेला ‘जी’ लावून मान दिला आहे. भले ही नंतर त्यांनी सारवासारव केली, मात्र व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यांच्यावर देखील विरोधकांनी निशाणा साधला.