MPSC विरुद्ध लिहाल तर काही परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात येईल, आयोगाचा विद्यार्थ्यांना इशारा; विद्यार्थ्यांकडून संताप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराबाबत असभ्य, असंस्कृत आणि असंसदीय वक्तव्य करणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात कारवाईचा बडगा आयोगाकडून उगारण्यात आला आहे. आयोगाच्या (Commission) कार्यशैलीबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरुपी परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात येईल असा इशारा एमपीएससी (MPSC) आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आला आहे.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) राबविल्या जात असलेल्या भरती प्रक्रियांबाबत अनेकदा प्रसारमाध्यमे, समाज माध्यमे आणि सार्वजनिक ठिकाणी उमेदवारांकडून चुकीच्या भाषेचा वापर करण्यात येत असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. अशा भाषेमुळे आयोगाच्या प्रतिष्ठेला बाधा येत असून अशा उमेदवारांविरुद्ध कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्यात येणार आहे. तसेच आयोगाच्या स्वत:च्या अधिकारांचा वापर करुन अशा उमेदवारांना परीक्षा (Examination) देण्यापासून देखील वंचित ठेवण्यात येईल असं आयोगाने पत्रकात नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी देखील आयोगाने असभ्य भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना कारवाईचा इशारा दिला होता.

दरम्यान, आयोगाच्या या भूमिकेवर परिक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कोरोनाचा (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षापासून परिक्षा घेण्यात आलेल्या नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी राज्यात 18 ते 20 लाख विद्यार्थी एमपीएससी परीक्षा (MPSC Exam) देत असतात. परंतु गेल्या दोन वर्षात या परीक्षा घेण्यात आलेल्या नाही त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अडचणीत सापडले आहे. दरम्यान, आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट असून यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

Web Title :- MPSE | if student write against mpsc on social media will not allowed to the exam says mpsc

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omicron Covid Variant | अत्यंत चिंताजनक ! मुंबई, पुण्यात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग, धोका वाढल्यानं काळजी घेणं गरजेचं

 

Wardha Crime | प्रेमाच्या प्रकरणात जेरबंद ! बाहेर आल्यावर उदरनिर्वाहासाठी टाकली टपरी, अन् संपवलं जीवन

 

Post Office Saving Schemes | घरात मुल जन्माला येताच पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, 5 वर्षात मुल होईल ‘लखपती’ !

 

Ratan Tata | रतन टाटांना वाढदिवसाचा केक भरवणारा ‘तो’ तरुण कोण? त्याचा पुण्याशी काय संबंध? जाणून घ्या (व्हिडिओ)

 

EPFO e-Nomination | EPFO ने वाढवली ई-नॉमिनेशन सबमिट करण्याची शेवटची तारीख, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया