आता फक्त 50 रूपयांमध्ये करता येईल MRI , Dialysis साठी मोजावे लागणार 600 रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दुसरीकडे रूग्णालयांकडून आकारण्यात येणारी लाखो रूपयांची बिलं पाहून रूग्णाच्या नातेवाईकांच्या तोंडाला अक्षरश: फेस येत आहे. अनेक ठिकाणी यावरून मोठे वाद होत आहेत. शिवाय सामान्य माणूस अगोदरच आर्थिकदृष्ट्या पिचलेला असल्याने कोरोनाचे संकट झेलताना त्याला अनेक चटके सोसावे लागत आहेत. मात्र, अशा स्थितीत एक दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे दिल्लीत अवघ्या 50 रुपयांत एमआरआय करून मिळणार आहे. यामुळे कोरोना रूग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.

एक इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीने म्हटले आहे की, देशातील सर्वात ‘स्वस्त‘ निदान सुविधा ही डिसेंबरमध्ये गुरुद्वारा बंगला साहिब येथे सुरू होणार आहे. एमआरआयसाठी लोकांना फक्त 50 रुपये द्यावे लागतील. गुरुद्वारा परिसरातील गुरू हरकिशन रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर देखीलसुरू केले असून पुढील आठवड्यापासून हे काम सुरू होणार आहे.

50 रुपयांमध्ये मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एमआरआय)
दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी सांगितले की, डायलिसिस प्रक्रियेसाठी रुग्णांना 600 रुपये द्यावे लागतील. रुग्णालयाला 6 कोटीेंं डायग्नोस्टिक मशीन दान केले आहे. यामध्ये डायलिसिससाठी चार मशीन आणि अल्ट्रासाऊंड, एक्स-रे आणि एमआरआयसाठी प्रत्येकी एका मशीन आहे. गरजूंना केवळ 50 रुपयांमध्ये एकआरआय सुविधा उपलब्ध होईल, तर इतरांसाठी एमआरआय स्कॅनची किंमत 800 रुपये असेल.

एक्स-रे, अल्ट्रासाऊंड 150 रुपये
मनजिंदरसिंग सिरसा म्हणाले, खरे गरजू ठरवण्यासाठी डॉक्टरांची एक समिती स्थापन केली असून या समितीने ठरवलेल्या रूग्णाला या सेवेचा लाभ देण्यात येईल. खासगी लॅबमध्ये सध्या एमआरआयची किंमत 2,500 रुपये आहे. कमी उत्पन्न गटातील लोकांना एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड फक्त 150 रुपये द्यावे लागतील. या मशीन्स बसवण्याचे सुरू असून केंद्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. ही देशातील सर्वात स्वस्त सेवा आहे, असे सिरसा यांनी म्हटले.