Fake Alert : संयुक्त राष्ट्रानं जम्मू-काश्मीरला वेगळा देश मानलं नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुक पेज Shrinagar New Express ने आशियायी नकाशा शेअर करीत दावा केला आहे की, संयुक्त राष्ट्राने जगातील नकाशा प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये जम्मू- काश्मीर वेगळा देश मानला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हाच दावा ट्विटर युजर Afzar Bhatt याने देखील केला आहे.

खरं काय ?
सोशल मीडियावर करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. संयुक्त राष्ट्राने जम्मू-काश्मीरला वेगळ्या देशाचा दर्जा दिला नाही.

कशी केली पडताळणी ?
फोटोसोबत लिहलेल्या कॅप्शननुसार यूएन वर्ल्ड मॅपची पीडीफ फाईल पाहण्यात आली. त्यावेळी हा नकाशा सापडला. या नकाशात गोल केले आहे. ते लाईन ऑफ कंट्रोल (LOC) दाखवले आहे. हे शस्त्रसंधीचे उल्लंघन असलेली लाईन पाक अधिकृत काश्मीर आणि भारतीय काश्मीर दाखवत आहे. या नकाशात जम्मू काश्मीरला भारत आणि पाकिस्तान पेक्षा वेगळे दाखवण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्राने हेही स्पष्ट केले आहे की, नकाशात दाखवलेली सीमा, नाव अधिकृत नाही. तसेच संयुक्त राष्ट्राला याची कुठलीही मंजूरी नाही.

निष्कर्ष
संयुक्त राष्ट्राकडून जम्मू-काश्मीरला वेगळ्या देशाचा दर्जा देण्यात आला आहे, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. असे एका वृत्तपत्रान केलेल्या पडताळीत स्पष्ट झाले आहे.