मुकेश अंबानींच्या खिशात नव्हते पैसे, परंतु प्रपोजच्या पद्धतीनं केलं नीता यांना ‘इम्प्रेस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेम कधी कुणाशी होईल, हे सांगता येणे अशक्य आहे, पण कुणासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचे हा निर्णय तुमचाच असतो. भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणजेच अंबानी कुटुंबातही खुप लव्हबर्ड आहेत. काही दिवसांपूर्वीच लग्नाचा 35 वा वाढदिवस साजरा करणारे मुकेश आणि नीता अंबानी यांची लव्हस्टोरीसुद्धा काहीशी वेगळी आणि खास आहे.

तुम्हाला यांची प्रेमकथा सांगण्यापूर्वी सांगणार आहोत की, अखेर जाऊ टीनाने वहिनी नीताला कसे विश केले? टीनाने दोघांचा ब्लँक-व्हाईट फोटो शेयर करून लिहिले की, त्या जोडप्याला विवाहाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा, जे नेहमी एकमेकांमध्ये चांगल्या गोष्टी शोधतात. तुम्हा दोघांना नेहमी आनंद आणि प्रेम मिळत राहो. मुकेश आणि नीता यांचा विवाह 8 मार्च 1985 मध्ये झाला होता.

मुकेश यांच्या खिशात पैसे नव्हते, आणि तुम्ही तर जाणताच प्रेम करण्यासाठी सुद्धा पैसे लागतात. ज्या जमान्यात लव्ह मॅरेज करणे अतिशय अडचणीचे होते, त्या दशकात मुकेश अंबानी यांचे प्रेम नीता यांच्या सोज्वळपणावर जडले. फिल्मी स्टाईलने मुकेश यांनी नीता यांना प्रपोज केले आणि त्यांना लग्नासाठी विचारले. परंतु, मुकेश यांनी भर ट्रॅफिकमध्ये नीता यांना प्रपोज करत विचारले की, माझ्याशी लग्न करशील का? आणि सोबतच एक अट ठेवली की, यापुढे तु गाडी चालवायची नाही. नीता यांनी पण सहजच होकार दिला नाही त्यांनी पण एक अट ठेवली की, लग्नांनतर तू मला काम करण्यापासून थांबवायचे नाही. दोन्हीकडून एकमेकांच्या अटी मान्य झाल्यानंतर नीता यांनी होकार दिला.

एका इंटरव्ह्यूमध्ये नीता यांनी सांगितले की, मुकेश यांनी नेहमीच त्यांना साथ दिली आहे आणि प्रत्येक निर्णयात त्यांच्या पाठीशी ते खंबीर उभे राहिले आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीही वस्तू स्वताची असत नाही, सर्वजण सोबत स्वप्न बघतात आणि ती पूर्ण करतात. बिझनेसमुळे मुकेश हे खुप बिझी असले तरी ते एक चांगले कुटुंबप्रमुख आहेत. मुकेश कितीही उशीरा आले तरी सोबतच जेवण करतात. मला त्यांची ही सवय आवडते.