‘या’ ५ कोटी विद्यार्थींना मोदी २.० सरकारचे ‘गिफ्ट’, मिळणार ५ वर्ष ‘स्कॉलरशिप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी अल्पसंख्याक समाजाला सामाजिक – आर्थिक स्तरावर सशक्तीकरणासाठी येत्या ५ वर्षात ५ कोटी विद्यार्थींना स्कॉलरशिप मिळणार आहे असे सांगितले. एवढेच नाही तर यात मुलींची संख्या देखील आधिक असणार आहे.

अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाची संस्था मौलाना आजाद शिक्षा प्रतिष्ठानच्या  ६५ वी आमसभेची बैठक घेण्यात आली, त्यानंतर नकवी यांनी पत्रकरांशी संवाद साधताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इंसाफ, ईमान आणि विकास हि तीन सूत्रे अवलंबिली आहे. सरकारने साप्रंदायिकता आणि तुष्टीकरणतून मुक्ति देऊन सुदृढ विकासाला पोषक माहोल तयार केला आहे.

नकवी यांनी देखील सांगितले की, अल्पसंख्याक वर्गाच्या शाळा सोडलेल्या मुलींना देशातील प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्थामध्ये बाहेरुन प्रवेश देऊन त्यांना शिक्षण आणि रोजगाराशी जोडले जाईल. नकवी यांनी सांगितले की, देशभरातील मदरशांमधील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मदरासा शिक्षकांना विविध शेैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षण देऊन त्यांना मुख्यधारेत आणण्यासाठी हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि संगणकाचे शिक्षण देण्यात येईल. हे पुढील महिन्यापासून हे सुरु करण्यात येईल.

स्कॉलरशिपमध्ये सहभागी होतील ५ कोटी पेक्षा जास्त मुली –

अल्पसंख्याक कार्य मंत्री नकवी यांनी सांगितले की, ‘३ ई’ हा कार्यक्रम राबवण्यात येईल. याअंतर्गत एज्युकेशन, एम्प्लायमेंट आणि इम्पावरमेंट या कार्यक्रमांतर्गत पुढील पाच वर्षात प्री मॅट्रीक, पोस्ट मॅट्रिक तसेच मेरिट-कम-मीन्स या योजनेअंतर्गत ५ कोटी विद्यार्थांना स्कॉलरशीप देण्यात येईल. यात ५० टक्क्यांपेक्षा आधिक मुलींचा समावेश असेल. यातील आर्थिक स्वरुपाने मागे राहिलेल्या मुलांना १० लाखांपेक्षा आधिकांना बेगम हजरत महल बालिका स्कॉलरशिपचा समावेश करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त : (www.arogyanama.com)

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

 

You might also like