Mumbai Agra Highway Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर कार-कंटेनरचा भीषण अपघात, भाजप नगरसेवकासह चार जणांचा जागीच मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Agra Highway Accident | नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भाजप नगरसेवकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सकाळी सातच्या सुमारास चांदवड जवळ असलेल्या नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर झाला. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण नाशिकहून धुळे येथे चालले होते. (Mumbai Agra Highway Accident)

महामार्गावर झालेल्या भिषण अपघातात भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव आणि त्यांच्या मित्रांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्थ पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे याठिकाणी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातामध्ये किरण हरीचंद्र अहिरराव, अनिल विषणू पाटील, कृष्णकांत चिंधा माळी, प्रवीण मधुकर पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. भाजप नगरसेवक किरण आहिरराव यांच्या अपघाती मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. (Mumbai Agra Highway Accident)

अहिरराव आणि त्यांचे साथीदार नाशिक येथे उपचारार्थ गेलेल्या भूषण देवरे यांची विचारपूस करण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता नाशिकला गेले होते. रात्री ते उशिरा नाशिकहून स्विफ्ट कारमधून परतीच्या प्रवासाला धुळ्याकडे निघाले असता सोमवारी सकाळी चांदवड शिवारातील सोग्रस फाट्याजवळ त्यांची कार समोरील कंटेनरवर धडकली. ही टक्कर इतकी जोरात होती की, यामध्ये कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. कारच्या बोनेट पासून मागच्या सीट पर्यंतचा कारचा पत्रा पूर्णपणे चेपला गेला आहे. तर धडकेनंतर या कारचे छप्परही पूर्णपणे उखडले गेले आहे.

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar Public Meeting In Pune | अजित पवारांच्या पुण्यातील रोड-शो नंतर शरद पवारांची जाहीर सभा

Ujjwal Nikam Reaction On Maharashtra Political Crisis | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाळ कोणाचे?
उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान

Pune BJP | पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर ! 18 उपाध्यक्ष, 8 सरचिटणीस आणि 18 चिटणीस