‘या’ कारणामुळं मुंबईतील पद्मिनी ‘काळी-पिवळी’ टॅक्सी बंद, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mumbai Padmini Taxi मुंबईच्या रस्त्यावर धावणारी काळी पिवळी टॅक्सी जून 2020 मध्ये बंद होणार आहे. टॅक्सी युनियनच्या मते टॅक्सी बंद होण्यामागे अनेक कारणे आहेत. आयकॉनिक इंडो इटालियन मॉडेलची प्रीमियम पद्मिनी टॅक्सीचे प्रोडक्शन 2000 मध्ये बंद झाले होते. यानंतर मात्र 50 टॅक्सी रस्त्यांवर धावत होत्या. परंतू जून 2020 पासून ही टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावरुन धावणे बंद होईल.

यासंबंधित मुंबई टॅक्सी यूनियनचे म्हणणे आहे की ही प्रतिष्ठित कार आहे, परंतू नवी पिढी यात बसू इच्छित नाही, त्यांना तंत्रज्ञानने मॉडर्न कार पसंद आहेत आणि महागाईमुळे आता या कारची देखभाल करणे परवडणारे राहिले नाही.

केव्हा लॉन्च झाली होती पद्मिनी कार –

1964 साली फिअ‍ॅट 1100 डिलाइटच्या नावे बाजारात उतरवले होते. हे फिअ‍ॅट 1100 चे स्वदेशी वर्जन होते. परंतू लॉन्चिंगच्या 1 वर्षानंतर याचे नाव बदलून प्रीमिअर प्रेसिडेंट ठेवण्यात आले. 1974 साली पुन्हा याचे नाव बदलून प्रीमिअर पद्मिनी ठेवण्यात आले. हे नामकरण राणी पद्मिनीच्या नावे ठेवण्यात आले.

60 च्या दशकात दिल्ली आणि कोलकत्ता मध्ये अ‍ॅम्बेसिडरची चलती होती. यानंतर मुंबईत अधिकाऱ्यांनी पद्मिनी स्विकारली, याचे विशेष कारण तिचा साधारण आकार. यानंतर पद्मिनी मुंबईच्या रस्त्यावर दिसू लागली. 90 च्या दशकात 63 हजार 200 पद्मिनी टॅक्सी ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट मध्ये रजिस्टर करण्यात आली होती. बॉलिवूडच्या सिनेमात या काळ्या पिवळ्या टॅक्सी दिसल्या होत्या. परंतू ही टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरुन इतिहास जमा होईल.

होणारे प्रदूषण ठरेल कारण –

2013 साली वाढणार प्रदूषण पाहता 20 वर्ष जुन्या वाहनांवर प्रतिबंध लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामुळे या कार बंद करण्यात आल्या. परंतू पद्मिनीची कमी लोकांना कायम जाणवेल. कारण त्याच्याशी लोकांच्या भावना जोडल्या आहेत.

Visit : Policenama.com