‘ठाकरे सरकार’मध्ये आनंदी नाही काँग्रेस, आणखी काही महत्वाच्या खात्यांची केली मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केले खरे मात्र वारंवार काँग्रेस सत्तेमध्ये असून देखील नाराज असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण देखील तसेच आहे आपल्याला महत्वाचे एकही खाते मिळाले नसल्याने काँग्रेस नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेसमोर ठेवली ही अट
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी सांगितले की, काँग्रेसकडे जेवढी मंत्रीपदे आहेत त्याव्यतिरिक्त त्यांना आणखी काही महत्वाची खाती हवी आहेत. अशी मागणी काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीसमोर केली आहे.

ही खाती हवी आहेत काँग्रेसला
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसला काही महत्वाची खाती हवी आहेत. गृह निर्माण, उद्योग, ग्रामीण विकास आणि कृषी मंत्रालय या खात्यांवर काँग्रेसची नजर आहे. यापैकी दोन खाती तरी काँग्रेसला आपल्याकडे हवी आहेत.

काँग्रेसने वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे आपली नाराजी
काँग्रेसकडे असलेल्या खात्यांशी जनतेचा थेट संबंध नाही यामुळे राज्य काँग्रेसने दिल्ली हायकमांड कडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

ठाकरे सरकारमध्ये मंत्री बनू शकतात अजित पवार
शुक्रवारी अजित पवार याना मंत्रिपदाबाबत विचारले असता याबाबत पक्ष नेतृत्व निर्णय घेईल अशी माहिती त्यांनी दिली होती. 30 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यामध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांचे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. याबाबत त्यांना विचारले असता मी पक्ष नेतृत्वाचे पालन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/