‘त्या’ प्रकरणी महापालिका, रेल्वे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आझाद मैदान पोलिसांत कलम ३०४ अ अंतर्गत हा गुन्हा नोंदवला आहे.

हा पादचारी पुल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला, ३०हून अधिक लोक जखमी झाले. जखमींची प्रकृतीही गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – मृतांच्या परिवाराला ५ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत

ही दुर्घटना घडल्याने स्ट्रक्चरल ऑडिट प्रक्रियेचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट व दुरुस्ती कामांमध्ये निष्काळजी केल्याचे आढळल्याने त्यातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून ही संपूर्ण चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पादचारी पुल कोसळला ; ५ जणांचा मृत्यू ३६ जखमी

यापूर्वी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये या पुलाचेही ऑडिट करण्यात आले होते. पालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या ऑडिटमध्ये हा पूल योग्य स्थितीत असल्याचे आढळले होते, तथापि त्यामध्ये किरकोळ दुरुस्ती कामे सुचविण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

सनदशीर मार्ग त्यांना समजत नाही : राज ठाकरे यांची टीका

गुरुवारी रात्रीच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पुल कोसळल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका आणि रेल्वेमंत्र्यांवर निशाना साधला आहे. ही घटना दुदैर्वी आहे आणि मनसे अपघातग्रस्तांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दु:खात सामील आहे. नेहमीप्रमाणे रेल्वेमंत्री ट्विटरवरुन चौकशीचे आदेश कसे दिले, याची टिमकी वाजवतील, जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडले जात राहतील, मनसेने सनदशीर मार्गाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला, पण सनदशीर मार्ग त्यांना समजत नाही हे दुर्दैव आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

कोंढव्यातील प्लॉस्टिकच्या गोडावूनला भीषण आग ; गोडावूनसह १ रिक्षा, १ स्कुलव्हॅन भस्मसात 

धक्कादायक ! वीट कामगाराला खायला लावली ‘विष्ठा’