वांद्रे भागात ‘MTNLच्या इमारतीला आग, टेरेसवरील १०० पैकी ५० जणांना वाचवण्यात यश (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई शहरात आपत्तीचे सत्र सुरुच आहे. आता पुन्हा एका मुंबईतील वांद्रे परिसरातील एमटीएनएलच्या ९ मजली इमारतीला सोमवारी आग लागली. या आग लागलेल्या इमारतीच्या टेरेसवर जवळपास १०० लोक अडकल्याची माहिती मिळत होती. परंतू आता या १०० पैकी ५० जणांना वाचविल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत इमारतीच्या टेरेसवर अडकून बसलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न अग्नीशमन दलाकडून करण्यात येत आहे. या लोकांना अग्मीशमन दल लोकांना शिडीच्या आधारे उतरवत आहेत. आग विझवण्यासाठी १४ अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

अग्नीशमन विभागाच्या मते ही आग लेवल २ ची आग आहे. सध्या तरी कोणाच्याही दगवण्याची माहिती समोर आली नाही. परंतू आग वाढण्याआधीच टेरेसवर अडकलेल्या १०० लोकांना सुरक्षित खाली उतरवण्याचे आव्हान अग्नीशमन दलासमोर आहे.

या इमारतीच्या ३ ऱ्या आणि ४ थ्या मजल्याला अग्नीने घेरले आहे. यातून १५ पेक्षा आधिक लोकांना अग्नीशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले आहे.

याआधी मागील रविवारी मुबंईतच ताजमहल आणि डिप्लोमेट हॉटेलच्या जवळ असलेल्या चर्चिल इमारतीला आग लागली होती. यातून अग्नीशमन दलाने १४ लोकांना सुरक्षित बाहेर काढले होते. या गंभीर अगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि २ लोक गंभीर जखमी झाले होते.

आता पुन्हा आठवड्याभरानंतर पुन्हा अशीच आग लागल्याची घटना घडली आहे, एमटीएनएल (महाराष्ट्र टेलीकॉम निगम लिमिटेड) च्या ९ मजली इमारतीला आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यात कोणीही जखमी किंवा मृत झाल्याची माहिती अजून मिळाली नाही, मात्र टेरेस वर अडकलेल्या बाकी ५० लोकांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –