‘पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार’ : भाजप महिला नेता बरळली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पूलचा भाग कोसळ्याची घटना समोर आली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 31 जखमी झाली आहेत. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ होताना दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. परंतु दुसरीकडे एक भाजपा महिला नेता बरळल्याचे दिसत आहे. या नेत्याने या घटनेचं खापर चक्क पादचाऱ्यांच्या डोक्यावर फोडलं आहे.

संजू वर्मा असं या भाजपाच्या महिला नेत्याचे नाव आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी बोलताना त्यांनी या घटनेचं खापर पादचाऱ्यांच्या डोक्यावर फोडलं. सुरुवातीला संजू वर्मा यांनी हे नैसर्गिक संकट असल्याचं म्हटलं. यानंतर त्यांनी चक्क या दुर्घटनेशी सरकाराचा काहीही संबंध नसल्याचं सांगत हात वर करण्याचा प्रयत्नही केला. इतकेच नाही तर, या दुर्घटनेसाठी पादचारीच जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. संजू वर्मा यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला जात आहे.

सदर पूल दुर्घटनेत तीन महिलांसह 6 जणांचा मृत्यू झाला तर 31 गंभीर जखमी झाले आहेत. अपूर्वा प्रभू (35), रंजना तांबे (40), भक्ती शिंदे (40), जाहीद सिराज खान (32), तपेंद्र सिंह (35) मोहन कायगुंडे अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तिघी महिला जीटी हॉस्पिटलच्या कर्मचारी होत्या.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सीएसएमटी पूल दुर्घटनेतील जखमींची सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच घटनास्थळी जाऊन पुलाची पाहणीही केली. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईलच, मात्र आज संध्याकाळपर्यंत पूल दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कुणाची आहे, हे निश्चित करा,” असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. इतकेच नाही तर, “पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं असूनही अशा घटना होत आहेत, हे दुर्दैवी आहे. यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेत जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,” असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

‘हा’ पक्ष राज्यातील पूर्ण 48 जागा लढवणार ; काँग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांची मोठी गोची

#NewZealandShooting : क्रूरकर्मा हल्लेखोराने एकावेळी केले होते १७ FB Live

सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला खिंडार, शेतमजूर संघटना बरखास्त

पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर स्क्रॅच ; ६ पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

सीएसएमटी स्टेशनजवळील पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू ; 31 जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us