Mumbai High Tide Alert : मुंबईत हायटाईडचा अलर्ट ! 4.7 मीटरपर्यंत उसळू शकतात समुद्राच्या लाटा

मुंबई : मुंबईत जोरदार वार्‍यांसह पाऊस सतत सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवारी म्हणजे आज मुंबईत हायटाईडचा अलर्ट जारी केला आहे. रिपोर्टनुसार मुंबईत हायटाईडदरम्यान समुद्राच्या लाटा 4.75 मीटर उंचीपर्यंत उसळू शकतात. मुंबईमध्ये आज 01:33 वाजता हायटाईड आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग, हवामान विभाग, प्रशासन आणि पोलीसांसह सर्व यंत्रणा या संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत.

हायटाईडच्या दरम्यान मुंबईच्या किनारी भागात राहणार्‍या लोकांनी या काळात घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच समुद्राच्या किनार्‍यावरील परिसर रिकामे करण्यात आले आहेत. हवामान एजन्सी स्कायमेटनुसार, मुंबईसह महाराष्ट्राचा अंतर्गत भाग आणि कोकण क्षेत्रात 23 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे.

या दरम्यान, मुंबईत मेघगर्जनेसह हलका पाऊस होतच राहणार आहे, ज्यामुळे पुढील तीन-चार दिवस हवामान अल्हाददायक असणार आहे. मात्र, महाराष्ट्रात किनारी आणि काही अंतर्गत भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे (आयएमडी) डेप्युटी डायरेक्टर, केएस होसलीकर यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

स्कायमेटनुसार मागील काही दिवसांपासून शहरात हलका ते मध्यम पाऊस सुरूच आहे, ज्यामुळे हवामानाची स्थिती सुखद आहे आणि शहरात तपामानात किंचित घसरण झाली आहे. हवामान विभागाने शहरात मध्यम पावसासासह ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

गुरुवारी हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेने कमाल तापमान 30.2 डिग्री सेल्सियस आणि किमान तापमान 23.2 डिग्री सेल्सियस नोंदवले. दुसरीकडे कुलाबा वेधशाळेने कमाल तापमान 30.2 डिग्री सेल्सियस आणि न्यूनतम तापमान 26 डिग्री सेल्सियस नोंदवले.