तारीक अन्वर यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम यांचा राजीनामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल विमान खरेदी व्यवहाराबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस तारीक अन्वर यांनी लोकसभा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता अन्वर यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी सरचिटणीसपदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. हे राजीनामासत्र सुरूच राहणार की थांबणार यावर सध्या राजकीय चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पवार यांनी असे वक्तव्य केले नसल्याचा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f31f728-c3a1-11e8-9609-f9b08f59783e’]

अन्वर यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी सरचिटणीसपदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना हकीम यांनी औरंगाबाद, भिवंडी, मुंबई, यवतमाळ आणि विदर्भातील काही पदाधिकारीही पक्षातून बाहेर पडतील, असा दावा केला आहे.

मुनाफ हकीम म्हणाले, राजकारणातील धर्मांध शक्तींचा संसदीय मार्गाने मुकाबला करण्यासाठी तसेच धर्मनिरपेक्ष विचारांना मजबूत करण्यासाठी १९९९ साली तारिक अन्वर यांच्यासोबत आपण काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश करून काम करण्याचा संकल्प केला होता. अलीकडच्या काळात काही प्रश्नांवर राष्ट्रवादीची भूमिका मान्य होण्यासारखी नव्हती. पण पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्याविरोधात कोणी भाष्य करायचे असा प्रश्न होता. तथापि, पक्षाचे ज्येष्ठ नेते तारीक अन्वर यांनी ज्या कारणांसाठी पक्षसदस्यत्वाचा व खासदारकीचा राजीनामा दिला, ते कारण संयुक्तिक असल्यामुळे आपणही त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.असे हकीम म्हणाले.

शिवरायांच्या पुतळयाच्या खांद्यावर हात ठेवून भाजप मंत्र्याने काढला फोटो

दरम्यान, तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी म्हटले की, प्रत्येक राजकीय पक्षात कोण येतो, कोण जातो यानुसार पक्ष संपतो असे नाही. तारीक अन्वर यांनी चुकीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला आहे. त्यांचे राजीनामा देण्याचे कृत्य बेजबाबदारपणाचे आहे. अन्वर यांनी पवार यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी पवार यांना फोन करून त्यांची भूमिका समजून घ्यायला हवी होती. पक्षाला न विचारता त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांनी खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे दिला असल्याने त्यांच्याशी पुन्हा कसा संवाद साधायचा हा प्रश्नच आहे, असे पटेल यांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7688442d-c3a2-11e8-b88f-4bfc8679d3fa’]