Mumbai-Pune Express | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai-Pune Express | यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (Highway Traffic Management System) अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर कुसगाव ढेकू गाव कि.मी 56/900 व ओझर्डे ट्रॉमा केअर सेंटर जवळ कि.मी 74/900 येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) गॅन्ट्री (Gantry) उभारण्याचे काम सुरू आहे. ( Mumbai-Pune Express)

12 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार) कुसगाव टोलनाक्यावरून जुना मुंबई-पुणे महामार्गाने (Old Mumbai-Pune Highway) पुणे दिशेला वळविण्यात येणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. ( Mumbai-Pune Express)

गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी 2 वाजता मार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीत वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. ९८२२४९८२२४ वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या दूरध्वनी क्रमांक ९८३३४९८३३४ वर संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील दोन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

MP New CM Mohan Yadav | मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, शिवराज सिंह चौहान यांना ‘राजकीय विश्रांती’ दिल्याची चर्चा

Dhananjay Munde | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! किमान किती रूपये पीकविमा मिळणार?; कृषीमंत्र्यांनी दिले उत्तर

Devendra Fadnavis | कांदा निर्यातबंदीबाबत फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती, शेतकऱ्यांना दिले ‘हे’ आश्वासन

Pune Pimpri Chinchwad Crime News | घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा, ”राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे न्यायाने पाहत नसतील तर…”