Municipal Election | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Municipal Election | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राज ठकारे यांच्या नव्या घरी देवेंद्र फडणवीस आले असून दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होत असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे हे आपल्या नवीन घरात राहण्यास गेल्यानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ (Shivteerth) या निवासस्थानी दाखल झाले आहेत. ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तसे असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट म्हणता येणार नाही. कारण गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंची (Raj Thackeray) हिदुत्वाच्या संदर्भात घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. यासोबत मनसे आणि भाजप यांची आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकीत युती (MNS-BJP alliance) होण्याची देखील चर्चा मागील काही दिवसापासून सुरु आहे. (Municipal Election)

राज ठाकरे यांच्या घरी दाखल होताच देवेंद्र फडणवीस हे घाराच्या गॅलरीत येऊन माध्यमांसमोर एक पोजही दिली.
मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) निशाणा साधत आहेत.
तसेच राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनही करत आहेत.
सध्या राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) यावरही अद्याप तोडगा निघालेला नाही आणि एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेटही घेतली होती.
त्यामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात एसटी संपाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. (maharashtra municipal election 2022)

 

Web Title :- Municipal Election | BJP Leader devendra fadnavis and mns chief raj thackeray meeting at shivtirth mumbai reason behind meeting may be on maharashtra municipal election 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PPF Account | पीएफ अकाऊंट झालं असेल मॅच्युअर तर ‘या’ 3 ऑप्शनद्वारे काढू शकता पैसे, मिळत राहिल फायदा; जाणून घ्या

Anti Corruption Bureau Thane | गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागणार्‍या हवालदारावर गुन्हा दाखल

Green Peas Health Benefits | हिरवी मटर हिवाळ्यातील सुपरफूड ! प्रोटीनचे भांडार, हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले