‘मी बरा होतोय, आपल्याला पुणे शहरही लवकरच बरं करायचंय’ : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मी बरा आहे, लवकरच बरा होऊन घरी परतेन पण आपल्या सर्वांना एकत्रीत येऊन आपल्या पुणे शहराला यातून बरं करायचे आहे, असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. मुरलीधर मोहोळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असून आज त्यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे पुणेकरांशी संवाद साधला. यावेळी ते थोडेसे भाऊक झाल्याचे पहायला मिळाले. मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहर हे माझे कुटुंब आहे आणि याच भावनेतून आमची 15 ते 20 हजार माणसं काम करत आहेत. नर्सेस, डॉक्टर आरोग्य कर्मचारी हे काम करत असताना आमच्या सारख्यांनी घरात बसून किंवा ऑफिसमध्ये बसून काम करणे हे काही काम नाही. आमचं कर्तव्य म्हणून आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करून आमच्या माणसांना प्रोत्साहन देणं ही खरी कामाची संकल्पना किंवा व्याख्या असावी, असे त्यांनी सांगितले.

काम करत असताना यापूर्वी देखील मी दोन वेळा कोरोनाची टेस्ट करून घेतली होती. त्यावेळी ही टेस्ट निगेटिव्ह आली होती. तिसऱ्या वेळी केली त्यावेळी ती पॉझिटिव्ह आली. ते पुढे म्हणाले की, मगील चार महिन्यात मला वाटत होते की कधीना कधी मला कोरोना होईल. रोज मी पुणे शहरातील माहित देत असतो. त्यामुळे मी स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. यात काही वेगळे केले नाही. आज पुणे शहरात 23 हजार रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यापैकी मी एक आहे. यापेक्षा वेगळी भावना काहीच नाही. याची माहिती सर्वांना दिली कारण माझ्या संपर्कात अनेक लोक आले होते. त्यांची काळजी वाटल्याने आणि त्यांना काळजी घेता यावी यासाठी मी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या मी बरा आहे. माझ्या सर्व चाचण्या नॉर्मल आल्या आहेत. मी बरा झाल्यानंतर घरी जाईन. पण घरी आल्यानंतर माझे एक म्हणणे असेन मी बरा होतोय पण मला माझं पुणे शहर बरं करायचं आहे. म्हणून हॉस्पिटलमध्ये बसून सुद्धा जे काही करायचे ते मी करत आहे. आपल्या सर्वांना आपल्या पुण्याला यातून बाहेर काढायचे आहे. मी बरा झालोय पण माझं शहर अजून बरं नाही झालं. आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊ चांगलं काम करून आणि आपल्या शहराला यातून नक्की बाहेर काढू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यानच्या काळात त्यांना अनेकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला. त्या सर्वांचे आभार मानत ते थोडेसे भाऊक झाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like