भारतीय सैन्यातील जवानासह 27 दुर्ग सेवकांनी केलं रक्तदान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशावर कोरोना चे महाभयंकर संकट पसरले आहे. ह्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन, पोलिस, डॉक्टर, पत्रकार अहोरात्र परिश्रम घेत आहेत. राज्यामध्ये रक्त पुरवठा कमी पडत असल्याने मुरबाड नगरपंचायत व मुरबाड सह्याद्री प्रतिष्ठान विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या वेळी मुरबाड नगरपंचायत नगराध्यक्षा छाया चौधरी, मुरबाड नगरपंचायत मुख्यधिकारी परितोष कंकाळ, गटविकास अधिकारी केळकर, मनसे शहर अध्यक्ष नरेश देसले, सह्याद्री प्रतिष्ठान मुरबाड अध्यक्ष अजिंक्य हरड, माजी नगराध्यक्ष किसन कथोरे, जयवंत सूर्यराव, नारायण गोंधळी, रवींद्र देसले उपस्थित होते.

रक्तदान शिबिर मुरबाड पंचायत समिती येथे पार पडले या वेळी माजी नगराध्यक्षा शितळ तोंडळीकर, अमर माने, सह्याद्री प्रतिष्ठान मुरबाड अध्यक्ष अजिंक्य हरड, भारतीय सैन्यात आठ वर्षे कार्यरत असलेले सह्याद्री प्रतिष्ठान मुरबाड चे सदस्य मोहन तुकाराम भोईर यांन सह मोठ्या प्रमाणात रक्तदाते उपस्थित होते यावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमावलीचे पालन करण्यात आले तर शांती सेवा निधी ट्रस्ट टेक्नो ग्राप्ट मुरबाड यांनी रक्तदान शिबिरात मोफत मास वाटप केले.

रक्तदान शिबिराचे आयोजन मुरबाड नगरपंचायत तसेच मुरबाड सह्याद्री प्रतिष्ठान यांनी केले होते यावेळी तब्बल 100 बाटल्या रक्तदान करून मुरबाडकरांनी सहभाग नोंदवला तर मुरबाड नगरपंचायत नगराध्यक्षा छाया चौधरी मुख्यधिकारी परितोष कंकाळ यांनी विशेष लक्ष घालून रक्तदान करणाऱ्या नागरिकांचे तसेच टाटा मेमोरियल सेंटर खारघर डॉक्टरांचे विशेष आभार मानले या वेळी टाटा मेमोरियलचे डॉ मीनल पुजारी, अभय कुमार गुप्ता, एम एस डब्ल्यू अभितब रावताले यांनी हे ब्लड टाटा मेमोरियल सेंटर खारघर येथे जमा करणार असल्याचे संगितले.

देशात कर्फ्यु लागू असतांना ही कोरोना रुग्णांना लागणाऱ्या रक्ताची गरज पाहून या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. सकाळी 10:00 ते दुपारी 04:00 वाजेपर्यंत या शिबिरात मोठया प्रमाणात मुरबाड तालुक्यातील रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.