लघवीच्या वादातून तरुणाचा खून, 2 दिवसांपासून तरुणाचा मृतदेह पडून

पोलिसनामा ऑनलाईन टीम – महिलेसमोर लघवी करण्यावरून झालेल्या भांडणात 20 वर्षीय तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उस्मानाबाद परिसरात घडली आहे. पण त्यानंतर आरोपीला अटक करा या मागणीसाठी कुटुंबियांनी चक्क दोन दिवस मृतदेह ठेवला आहे. अद्याप तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पारधी समाजातील 20 वर्षीय तरुणाचा सहाजणांनी खून केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांनी 6 आरोपींविरोधात ढोकी पोलिसांत 302 आणि अट्रोस्टी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खूनाची घटना घडून 2 दिवस उलटून गेले आहेत. तरीही तरुणावर अद्यापही अंतविधी केला गेला नाही.

आरोपींवर अटक करा आणि कठोर शिक्षा करा या मागणीवर नातेवाईक ठाम आहेत. त्यामुळे 2 दिवसांपासून मृतदेहची फरफट सुरू आहे.महिले समोर लघवी केल्याचा राग धरून खून केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस हा आरोपींचा शोध घेत आहेत. पण नातेवाई निर्णयावर ठाम असल्यामुळे तरुणाचा मृतदेह पडून आहे. पोलिसांकडून नातेवाईकांना विश्वासात घेण्यात आले आहे. मात्रा, तरीदेखील नातेवाईक हट्टावर पेटले आहेत.