भर दिवसा घरात घुसून तरूणीचा निर्घृण खून

लातूर : पोलीसनामा आॅनलाईन

लातूर शहरातील एक धक्कादायक आणि अंगावर शहारा आणणारी एक घटना समोर आली आहे. लातूर शहरातील विशाल नगर भागात एका 20 वर्षीय तरूणीचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. अपुर्वा यादव असं या मुलीचं नाव आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर मारेकरी खून करून जाताना घरातील दोन्ही मोबाईल घेऊन गेल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.

अनंत यादव असं अपुर्वाच्या वडिलांचे नाव आहे. ते विशाल नगर भागातील उच्चभ्रू वसाहतीत राहत असूुन आज ते काही कामानिमीत्त बाहेरगावी गेले होते. अपुर्वाची आई देवीच्या कार्यक्रमासाठी दुपारी तासभर घराबाहेर गेली होती. दरम्यान घरामध्ये अपुर्वा ही एकटीच घरात होती. याच संधीच फायदा मारेकऱ्यांनी घेतला. मारेकऱ्याने घरात घुसून  तिचा निर्घृण खून केला. सर्वांना धक्का पोहोचवणारी आणि अंगावर काटा आणणारी ही घटना घडली आहे.
[amazon_link asins=’B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4312c25a-d158-11e8-bfc1-a9d2dba5b54a’]
अपुर्वाची आई जेव्हा घरी परतली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तिच्या आईला घराला बाहेरून कडी असल्याचे आढळून आले. मारेकऱ्याने अतिशय निर्घृणपणे अपुर्वाचा खून केला. अपुर्वाच्या गळ्यावर तसेच पोटावर तिक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. खून केल्यानंतर मारेकरी दाराला बाहेरुन कडी लावून पळून गेला. मारेकरी खून करून जाताना घरातील दोन्ही मोबाईल घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील भाजप आमदाराविरुद्ध अटक वॉरंट

अपुर्वाच्या खूनमुळे तेथील भागात चांगलीच खळखळ उडाली आहे. सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेकांना या घटनेमुळे धक्का पोहोचला आहे. अपुर्वाच्या आईला आणि वडिलांना तिच्या जाण्याने मोठा धक्का पोहोचला आहे. अचानक घडलेल्या या प्रकराने लातूर शहर हादरले आहे. या अनपेक्षित घटनेमुळे कुटुंबियांना मानसिक धक्काच पोहोचला आहे. दरम्यान अपुर्वाचा खून का झाला आहे याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मारेकऱ्याचे नावही अद्याप समोर आलेले नाही. अपुर्वाच्या खूनाबाबत पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समजत आहे. चक्क भर दिवसा घरात घुसून होणे ही एक घाबरून देणारीच घटना आहे. घरी एकटी मुलगी घरात सुखरूप नाही का असा प्रश्न परिसरामध्ये उपस्थित केला जात आहे.