चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खुन, पतीला औरंगाबादेत अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइ – चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारुन तिचा खुन करुन फरार झालेल्या पतीला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. अतिश कोंडीराम काळे (वय ३५, रा. बालाजीनगर, भोसरी) असे त्याचे नाव आहे. त्याने भोसरीतील गुळवे वस्तीमध्ये सोमवारी रात्री पत्नीचा खून केला होता.

कावेरी विशाल खवळे ऊर्फ कावेरी अतिश काळे (वय ३०) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ संतोष सजेर्राव देठे (वय ३२, रा. जगतापनगर, थेरगाव) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, कावेरी आणि अतिश काळे हे पती पत्नी होते. अतिश कावेरीच्या चारित्र्याचा संशय घेत असे. त्यावरुन यापूर्वी त्यांच्यात भांडणे झाली होती. कावेरी या सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता भोसरीतील गुळवे वस्ती येथे गेल्या होत्या. हे समजल्यावर अतिशही तेथे गेले. संजय हिरामण लांडे यांची रुम नं ५ चे समोर त्याने कावेरी यांच्या डोक्यात फरशीचा मोठा तुकडा मारुन तिला गंभीर जखमी केले. त्यात तिचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

खुन केल्यानंतर अतिश हा तेथून पळून गेला होता. तो औरंगाबादला आला होता. क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस रात्री गस्त घालत असताना त्यांना संसारनगर परिसरात अतिश बसलेला आढळून आला होता. एकटाच बसला असल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला. त्यांनी त्याला पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केल्यावर त्याने आपण पत्नीचा खुन करुन पळून आल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला ताब्यात घेण्यासाठी भोसरी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी